मुंबई : मुंबईमधून खंडणीसाठी अपहरण केलेल्या 3 वर्षांच्या चिमुरडीचा काल मध्यरात्री मृतदेह आढळून आला. जेनुरा खान असं मृत मुलीचं नाव असून कामाठीपुरामधल्या मौलाना आझाद रोड परिसरात हा मृतदेह आढळून आला.

मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून जेनुराची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हत्या करणारे दोघेही आरोपी अल्पवयीन असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

ही चिमुरडी गायब झाल्यापासून तिच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली जात होती. याप्रकरणी जे.जे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.