सोसायटीतील स्विमिंग पूलमध्ये बुडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 24 May 2016 07:17 AM (IST)
कल्याण: कल्याण पश्चिमेकडील सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या ९ वर्षीय मुलीचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गोदरेज हिल परिसरात रोजालिया संकुलातील आवारात ही घटना घडली आहे. रविवारी दुपारी या इमारतीमध्ये राहणारी मुले या स्विमिंग पूलमध्ये पोहत होती. यावेळी ९ वर्षाची दृष्टी सिंग या स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना अचानक बुडू लागली. आजूबाजूच्या मुलांनी आरडाओरडा सुरु केला. आरडाओरडा ऐकू येताच तिच्या पालकांनी लगेच स्विमिंग पूलमध्ये धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दृष्टीचा मृत्यू झाला होता. या स्विमिंगपूलवर सुरक्षिततेसाठी लाईफ गार्ड नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने हि घटना घडल्याचा आरोप कुटुंबियांना केला आहे. याप्रकरणी लाईफ गार्ड हेमंत राऊत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हेमंत राऊत फरार झाला असून सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.