मुंबई : घाटकोपरच्या होर्ल्डिंग दुर्घटनेतील (Ghatkopar Hoarding Falls) मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे आहे. होर्डिंग दुर्घटनास्थळी अद्यापही मोठ्या प्रमाणात लोखंडी ढिगारा आहे. लोखंडी ढिगाऱ्याखाली 25 ते 30 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अजून अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोल पंपावर होर्डिंग पडलं, तिथे मोठ्या प्रमाणात लोखंडी ढिगारा असून तो उपसण्याचं काम सुरु आहे. ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती असल्याने बचावकार्य सुरु आहे. बचावकार्याला आणखी 24 तास लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.


घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू


घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यूंचा आकडा 17 वर पोहोचला आहे.  घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनामध्ये 50 तास उलटून गेले आहेत. अजून देखील  NDRF आणि महापालिका आपत्ती सेवा,अग्निशमन  दलांकडून बचावकार्य सुरूच आहे. आतापर्यंत 50 टक्के ढिगारा उपसण्याचं काम पूर्ण झालं असून 50 टक्के काम बाकी आहे. 


बचावकार्याला आणखी 24 तास लागणार


ढिगाऱ्याखालून 25 दुचाकी आणि 10 चारचाकी वाहने बाहेर काढल्या आहेत. याठिकाणी एक जोडपं आणि एक वाहन चालक याठिकाणी असे एकूण 3 जण अडकले असून त्यांना जेसीबीच्या माध्यमातून बाहेर काढण्याचं काम NDRF जवानांच्या माध्यमातून केला जात आहे. आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू तर 75 जण जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.


दाम्पत्य होर्डिंगखाली अडकलं


घाटकोपरच्या होर्ल्डिंग दुर्घटनामध्ये मुंबई विमानतळावर ट्राफिक कंट्रोलचे जनरल मॅनजर मनोज चनसूर्या वय 60 आणि त्यांच्या पत्नी हे अजून देखील या घटनेत अडकले असून आपले पत्नी सोबत मध्यप्रदेश ला गावी जात असताना या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले होते मात्र याचवेळी हे भलं मोठं होर्ल्डिंग कोसळल्याने ते यामध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहेत तर त्यांचे जवळचे मित्र परिवार या ठिकाणी दाखल झाले आहेत तर अजून देखील बचावकार्य सुरूच आहे. 


दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार उघड्यावर


मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली. होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर होर्डिंगखाली अडकलेले 88 जण जखमी झाले आहेत. अनेक जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.  घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे अनधिकृत जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं. या दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.



महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : घाटकोपर होर्डिंग दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार, पोलिसांकडून शोध सुरू