पायलट मारिया झुबेरी, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे यांचा मृत्यू झाला. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला.
चाचणीसाठी दुपारी दीडच्या सुमारास जुहू हेलिपॅडवरुन या विमानाने उड्डाण केलं. मात्र घाटकोपरपर्यंत पोहोचताच दुर्घटनाग्रस्त झालं आणि भर वस्तीत कोसळलं.
हे विमान उत्तर प्रदेश सरकारचं होतं. या विमानाला अलाहाबादमध्ये 2013 मध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने हे विमान 2014 मध्ये मुंबईतील यूव्हाय एव्हिएशनला विकलं होतं. या कंपनीने अलाहाबादमधील अपघातामुळे विमानाला झालेला बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर हे विमान उड्डाणासाठी पूर्णत: सज्ज आहे का हे तपासण्यासाठी आजची चाचणी घेण्यात येत होती. त्यावेळ दुर्घटनाग्रस्त झालं.
घाटकोपरमध्ये नेमकं काय झालं?
1.00 वा. दुपारी एकच्या सुमारास जुहूवरुन उड्डाण
दुपारी 1 वा 10 मिनिटांच्या सुमारास घाटकोपरमध्ये विमान कोसळलं
1.16 वा. अग्निशमन दलाला पहिला कॉल
1.37 वा. अग्निशमन दल घाटकोपरमध्ये घटनास्थळी दाखल
1.39 वा. लेव्हल वन आगीची सूचना
1.40 वा. आगीवर ताबा
तीन फायर इंजिन आणि 1 जंबो वॉटर टँकर घटनास्थळी
विमान नेमकं कसं होतं?
अपघातग्रस्त विमान - किंग एअर सी-90 विमान
UY एव्हिएशन कंपनीचं चार्टर्ड प्लेन
या विमानाची प्रवासी क्षमता 12
या विमानात चार जण होते. त्यापैकी दोन महिला होत्या. एक पायलट आणि एक तंत्रज्ञ
संबंधित बातम्या
मुंबईत भर वस्तीत विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू
घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं!