मुंबई: दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील समुद्रात एक प्रवासी बोट उलटल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. एका स्पीडबोटने टक्कर दिल्याने ही प्रवाशी बोट बुडाली. हा अपघात घडला तेव्हा प्रवासी बोटीत तब्बल 80 प्रवासी होते. या दुर्घटनेत आतापर्यंत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 56 प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. ही बोट गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जात होती. त्यावेळी कारंजा गावाच्या परिसरात स्पीडबोटने  प्रवासी बोटीला धडक दिली. या धडकेनंतर प्रवासी बोटीत पाणी शिरले आणि ती बुडायला सुरुवात झाली. 


प्राथमिक माहितीनुसार,  JOC येथून प्राप्त माहितीनुसार  एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये 20 ते 25 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर ठिकाणी नौदल, JNPT,  Coast guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचावकार्य सुरु करण्यात आले.


या दुर्घटनेनंतर अनेक प्रवाशांना अपघातग्रस्त बोटीतून सुखरुप बाहेर काढून किनाऱ्यावर आणण्यात आले. यापैकी अनेक प्रवाशी भिजलेले होते. किनाऱ्यावर आणल्यानंतर पोलिसांकडून या प्रवाशांची विचारपूस केली जात आहे. त्यांची वैद्यकीय तपासणीही केली जात आहे.


एक स्पीडबोट आमच्या बोटीभोवती घिरट्या घालत होती अन्... प्रत्यक्षदर्शी काय म्हणाला?


या दुर्घटनेनंतर ज्या प्रवाशांना किनाऱ्यावर आणण्यात आले त्यापैकी एकाने समुद्रात नक्की काय घडले, याची माहिती 'एबीपी माझा'ला दिली. त्याने सांगितले की, आमची बोट समुद्रात पाच ते आठ किलोमीटर आतमध्ये गेली. त्यावेळी मी बोटीच्या वरच्या डेकवर उभा होतो. त्यावेळी एक स्पीडबोट आमच्या बोटीच्या आजुबाजूला फिरत होती. ही स्पीडबोट कधीही आमच्या बोटीला धडकेल, असे मला वाटत होते आणि तसेच घडले. ही स्पीडबोट जोरात येऊन आमच्या बोटीला धडकली. त्यावेळी स्पीडबोटमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या प्रवाशाचा पाय कापला केला. रक्तबंबाळ अवस्थेतील त्या प्रवाशाला आमच्या बोटीत घेण्यात आले. स्पीडबोटची धडक बसल्यानंतर आमच्या बोटीत पाणी शिरायला झाले आणि बोट समुद्रात बुडायला लागली, अशी माहिती प्रत्यदर्शीने दिली. 


या दुर्घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये स्पीडबोट नीलकमल या बोटीला धडकताना दिसत आहे. स्पीडबोट लांबून प्रवासी बोटीच्या दिशेने येताना दिसत आहे. मात्र, ऐनवेळी स्पीडबोटच्या चालकाला वळण न घेता आल्यामुळे स्पीडबोट नीलकमला बोटीला धडकल्याचे दिसत आहे.


VIDEO: स्पीडबोट नेमकी कशी धडकली?



आणखी वाचा


मोठी बातमी: गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात एलिफंटाला जाणारी प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली, 20 ते 25 जण अडकल्याची माहिती