Mumbai: गणेश चतुर्थीनिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून दिलासादायक बातमी आहे . त्याला पण मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे .250 गणपती विशेष रेल्वे फिरायची यादी जाहीर झाली असून सर्व गाड्यांचे आरक्षण 24 जुलैपासून सुरू होणार आहे .मुंबई, पुणे व लोकमान्य टिळक टर्मिनलसह विविध स्थानकांवरून कोकण मार्गावर आणि गोव्याच्या दिशेने धावणाऱ्या विशेष गाड्या धावणार आहेत .
गणपती आणि चाकरमानी यांचं नातं अतूट आहे .दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागांमधून चाकरमानी कोकणात रवाना होतात . चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दरवर्षी रेल्वे प्रशासन कोकण मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन करते .नेहमीच्या रेल्वे सेवा आणि लोकल व्यतिरिक्त या गाड्या असतात .त्यामुळे चाकरमान्यांना सहजरीत्या आणि सुरक्षित प्रवास करता येतो .
कोणत्या रेल्वे धावणार? वाचा वेळापत्रक
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकण मार्गावर विविध विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई (CSMT), लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), पुणे आणि दिवा येथून सावंतवाडी, रत्नागिरी, मडगाव आणि चिपळूणकडे जाणाऱ्या या विशेष गाड्या 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान धावणार आहेत.
- सीएसएमटी–सावंतवाडी रोड विशेष गाडी (01151/01152) दररोज सुरू राहणार आहे. गाडी क्रमांक 01151 CSMT वरून दररोज रात्री 12:20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2:20 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. तर परतीची गाडी क्रमांक 01152 सावंतवाडी येथून दररोज पहाटे 3:35 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4:35 वाजता CSMT येथे पोहोचेल.
- सीएसएमटी–सावंतवाडी–सीएसएमटी विशेष गाडी (01103/01104) सुद्धा दररोज धावेल. गाडी क्रमांक 01103 CSMT वरून दुपारी 3:30 वाजता सुटेल आणि त्या दिवशी रात्री 4:00 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01104 दररोज पहाटे 4:35 वाजता सावंतवाडी येथून सुटेल आणि दुपारी 4:40 वाजता CSMT ला पोहोचेल.
- सीएसएमटी–रत्नागिरी विशेष गाडी (01153/01154) रोज धावणार आहे. गाडी क्रमांक 01153 CSMT वरून दररोज सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि रात्री 8:10 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01154 रत्नागिरीहून दररोज सकाळी 4:00 वाजता सुटून दुपारी 1:30 वाजता CSMT ला पोहोचेल.
- एलटीटी–सावंतवाडी रोड दैनिक विशेष गाड्या (01167/01168 आणि 01171/01172) ही दररोज सेवा देतील. गाडी क्रमांक 01167 दररोज रात्री 9:00 वाजता एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:20 वाजता सावंतवाडीत पोहोचेल. गाडी क्रमांक 01168 सावंतवाडीहून दररोज सकाळी 11:35 वाजता सुटेल आणि रात्री 12:40 वाजता एलटीटी येथे पोहोचेल. त्याशिवाय गाडी क्रमांक 01171 एलटीटी वरून दररोज सकाळी 8:20 वाजता सुटून रात्री 9:00 वाजता सावंतवाडीला पोहोचेल, तर 01172 क्रमांकाची गाडी दररोज रात्री 10:35 वाजता सावंतवाडीहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 10:40 वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
- एलटीटी–सावंतवाडी साप्ताहिक विशेष गाडी (01129/01130) ही 26 ऑगस्ट, 2 आणि 9 सप्टेंबर रोजी धावेल. 01129 एलटीटी वरून सकाळी 8:45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10:20 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. 01130 ही परतीची गाडी सावंतवाडीहून रात्री 11:20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11:45 वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
- एलटीटी–मडगाव साप्ताहिक विशेष गाडी (01185/01186) फक्त 27 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबर रोजी धावेल. 01185 ही गाडी एलटीटी वरून रात्री 12:45 वाजता सुटून दुपारी 2:30 वाजता मडगावला पोहोचेल. परतीची गाडी 01186 मडगावहून संध्याकाळी 4:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 4:50 वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
- एलटीटी–मडगाव एसी साप्ताहिक विशेष गाडी (01165/01166) 26 ऑगस्ट, 2 आणि 9 सप्टेंबर रोजी धावेल. गाडी क्रमांक 01165 एलटीटीहून 12:45 वाजता सुटून दुपारी 2:30 वाजता मडगावला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01166 संध्याकाळी 4:30 वाजता मडगावहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 4:50 वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
- पुणे–रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडी (01447/01448) 23, 30 ऑगस्ट व 6 सप्टेंबर रोजी धावेल. गाडी क्रमांक 01447 पुण्याहून रात्री 12:25 वाजता सुटून सकाळी 11:50 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. गाडी क्रमांक 01448 रत्नागिरीहून सकाळी 5:50 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 5:00 वाजता पुण्यात पोहोचेल.
- पुणे–रत्नागिरी एसी विशेष गाडी (01445/01446) सुद्धा 26 ऑगस्ट, 2 आणि 9 सप्टेंबर रोजी धावेल. 01445 ही गाडी पुण्याहून 12:25 वाजता सुटेल आणि सकाळी 11:50 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीची 01446 ही गाडी संध्याकाळी 5:50 वाजता रत्नागिरीहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 5:00 वाजता पुण्याला पोहोचेल.
- दिवा–चिपळूण–दिवा मेमू अनारक्षित विशेष गाडी (01155/01156) दररोज धावेल. गाडी क्रमांक 01155 दिवा येथून सकाळी 7:15 वाजता सुटून दुपारी 2:00 वाजता चिपळूण येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01156 चिपळूणहून दुपारी 3:30 वाजता सुटून रात्री 10:50 वाजता दिवा येथे पोहोचेल.