सचिनच्या घरी बाप्पा विराजमान, जाॅन्टी ऱ्होड्सचीही उपस्थिती
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2016 05:21 PM (IST)
मुंबईः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरीही गणपती बाप्पांचं आगमन झालं. सचिनने पारंपरिक पद्धतीने गणेशपूजन करुन मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्सनं सचिनच्या घरी गणपतीचं दर्शन घेतलं. सचिनच्या घरी दरवर्षी भक्तीभावानं गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. सचिन तेंडुलकरने आपल्या घरच्या गणपतीचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.