आर्थर रोड जेलमध्ये गँगवॉर, मुस्तफा डोसा-पप्या गँग भिडले
एबीपी माझा वेब टीम | 30 May 2016 02:43 PM (IST)
मुंबई : मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. मुस्तफा डोसा आणि पप्या गँगशी संबंधित कैद्यांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात सहा कैदी जखमी झाले आहेत. आर्थर रोड जेलमध्ये आज सकाळी आठच्या सुमारास दोन गँगशी संबंधित कैदी भिडले. मोक्काचा आरोपी असलेल्या विनोद नायर आणि अरमान खान गँगमध्ये काही कारणावरुन हाणामारी झाली. कैद्यांनी सशस्त्र हल्ला केला, ज्यात 6 ते 7 कैदी गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहे. अरमान खान हा मुस्तफा डोसा गँगचा आहे. दरम्यान या हल्ल्यात काही पोलिसही जखमी झाले आहेत. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. कैदी आणि तिथे उपस्थित जेल कर्मचाऱ्यांचा जबाब घेऊन पोलिस गुन्हा दाखल करतील.