याशिवाय हा वादग्रस्त व्हिडीओ ब्लॉक करण्यासाठी सायबर सेल गूगल, फेसबुक आणि यू-ट्यूबच्या संपर्कात आहे.
सचिन आणि लतादीदींवर एआयबीच्या तन्मय भट्टकडून अश्लाघ्य टिप्पणी
काय आहे प्रकरण?
'एआयबी' शोच्या माध्यमातून तन्मय भट्टने सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचे चेहरे मॉर्फ करुन एक व्हिडीओ ट्विवटरवर शेअर केला होता. ज्यात सचिन आणि लता दीदी यांच्यातील खोटं संभाषण दाखवलं गेलं. मात्र यातील संवाद आक्षेपार्ह आणि अवमान करणारे आहेत.
आयबीच्या तन्मय भटची मुजोरी कायम
तन्मय भटची मुजोरी कायम
यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठूनही तन्मय भट्टने मात्र त्याच्या कृत्याचं समर्थन केलं आहे. शिवाय दिग्दर्शक दिग्दर्शक राम गोपाल वर्मानेही तन्मयच्या व्हिडीओचं समर्थन केलं आहे.
तन्मय भटवर कडक कारवई करा, निलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्र्यांना ई- मेल
व्हिडीओविरोधात सर्वपक्षीयांची नाराजी
तन्मय भटच्या या व्हिडीओविरोधात सर्वपक्षीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तन्मय भट विरोधात कडक कारवाई करा, अशी मागणी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे मुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्तांना केली आहे. तसंच मनसेनेही तन्मय भट्ट आणि एआयबी या कार्यक्रमाविरोधात तक्रार दाखल केली आहे.