नवी मुंबई : खोट्या कागदपत्रांद्वारे महागड्या गाड्या विकणाऱ्या टोळीला कामोठे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रविण खंदबाज, विकी गायकवाड, मोसम पाटील आणि विश्वास कदम अशी चार आरोपींची नावं आहेत.
चौघा आरोपींनी साई समर्थ टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स नावानं कंपनी सुरु केली होती. यामध्ये गाड्या भाड्यानं लावल्या जात असत. पुढे या चौघांनी गाडी मालकांना अंधारात ठेवून परस्पर खोटी कागदपत्रं तयार केली आणि गाड्यांची विक्री केली.
या टोळीचा कारनामा लक्षात आल्यानंतर गाडी मालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. कामोठे पोलिसांनी या टोळीकडून पावणे दोन कोटींची वाहनं जप्त केली आहेत. या टोळीकडे आणखी काही गाड्या असण्याची शक्यता आहे.