मुंबई : पालिका मुख्यालयात आज (1 ऑगस्ट) गणेशोत्सोव तयारीसंदर्भात मुंबई महापालिका, गणेशोत्सव समन्वय समिती, पोलीस, एमएमआरडीए यांच्यात संयुक्त बैठक पार पडली. यावेळी मुंबईचे महापैर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गणरायाचे आगमन आणि विसर्जन असणाऱ्या रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत.
करी रोड आणि चिंचपोकळी या धोकादायक पुलांवरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचा वाहतूक विभाग आणि पालिकेचे अधिकारी या पुलांची संयुक्त पाहणी करतील. त्यानंतर या पुलावरुन गणपतीचे आगमन आणि विसर्जन करण्यासंदर्भातील निर्णय घेणार आहेत.
दरम्यान, मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे गणेशोत्सवात अडचणी येऊ नयेत, यासाठी लवकरात लवकर पार्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्याचे आदेश महापौरांनी मेट्रो आणि मोनो प्रशासनाला दिले आहेत.
या बैठकीवेळी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे येणाऱ्या अडचणी, मोनोमुळे अरुंद झालेले रस्ते, बॅरीगेट्समुळे उद्भवलेल्या अडचणी याचा पाढाच वाचण्यात आला. महापौरांनी या तक्रारींची दखल घेऊन अरुंद रस्ते मोठे करण्याचे, अडचणींच्या जागी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्याचे आदेश मेट्रो आणि मोनो प्रशासनाला दिले आहेत.
मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत पालिका प्रशासन गंभीर आहे. मुंबईतील 23 अतिधोकादायक इमारती महिन्याभरात पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले आहे.
मुंबई : गणपती विसर्जन मार्गातील रस्त्यांवरील खड्डे 15 दिवसांत बुजवण्याचे महापौरांचे निर्देश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2019 11:32 PM (IST)
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आज (1 ऑगस्ट) गणेशोत्सोव तयारीसंदर्भात मुंबई महापालिका, गणेशोत्सव समन्वय समिती, पोलीस, एमएमआरडीए यांच्यात संयुक्त बैठक पार पडली.
getty image
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -