मुंबई : अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळ्याता आतापर्यंत अडीचशे कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंनी दिली आहे.
रमेश कदमच्या नावावर असलेला औरंगाबादमधील 2.5 एकरचा प्लॉट आणि मुंबईतील मलबार हिल येथील 106 करोड रुपयांचा भूखंड जप्त करण्यात आला आहे. विमल शहा यांच्याकडून बंगला बांधण्यासाठी मलबार हिल येथे भूखंड घेतला होता.
वाचा : अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची कहाणी...
अण्णाभाऊ आर्थिक महामंडळ घोटाळ्यात रमेश कदमला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. सध्या तो तरुंगाची हवा खातो आहे.
अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळा : आतापर्यंत 250 कोटींची मालमत्ता जप्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Aug 2017 06:08 PM (IST)
रमेश कदमच्या नावावर असलेला औरंगाबादमधील 2.5 एकरचा प्लॉट आणि मुंबईतील मलबार हिल येथील 106 करोड रुपयांचा भूखंड जप्त करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -