मुंबई : हॅप्पी बर्थ डे गबरु. पूजा चव्हाणचे व्हायरल झालेले नवे फोटो चर्चेला हवा देणारे आहेत. कारण या फोटोत केकवर नाव लिहिलेला हा गबरु नक्की कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुसऱ्या फोटोत एक माणूस आपल्या हाताने पूजा चव्हाणला केक भरवतोय. इतकंच नाही तर त्या हातावर शिवसेनेचा धागा... म्हणजेच शिवबंधन बांधलंय. शिवाय काळा दोराही बांधला आहे.

दुसऱ्या एका फोटोमध्ये पूजा स्वतः वनमंत्री असं नाव लिहिलेला केक कापतेय.

आता हे दोन फोटो बघा. त्यातील लोकेशन सेम, लॉन सेम, बॅकग्राऊंड सेम आणि डोक्यावरची फरची टोपीही सेम.

त्यामुळे या दोन फोटोंवरुनही प्रश्न विचारले जात आहेत. आता एक अशी ऑडिओ क्लिप सापडली आहे, जी थेट पूजाच्या लॅपटॉपमधली असल्याचं बोललं जात आहे. या क्लिपमधला मजकूर तर संजय राठोड यांच्यावर प्रश्न निर्माण करत आहे.

असं काय आहे या क्लिपमध्ये?

गबरुशेठ - हॅलो

पूजा चव्हाण - आपका हुकूम सर आँखों पर..रिजेक्ट लिस्टमधून नंबर काढलाय.

गबरुशेठ - हाहाहाहाहा...क्या बात है..थँक्यू थँक्यू..

पूजा चव्हाण - मी महिनाभर तरी काढणार नव्हते, मात्र तुमच्या शब्दापुढे जाता येत नाही.

गबरुशेठ - असं का...?

पूजा चव्हाण - विचारा किती दिवसांपासून...आठ दिवस झाले....अजून महिनाभर ठेवणार होते.

गबरुशेठ - वेटिंगवर टाका वेटिंग...मग बाकी...

पूजा चव्हाण - बाकी काय...हाय की आता तुमचं...काय करावं...इलाज नाही..

गबरुशेठ - कवा जायचं आपल्याला...

पूजा चव्हाण - मुंबईला आपणच का?

गबरुशेठ - कुठंही जाऊ काय त्यात?

पूजा चव्हाण - बघा...आं...

गबरुशेठ - यस्स्स....

पूजा चव्हाण - कुलू मनालीला...आणि जम्मू काश्मीरला जाऊ...

गबरुशेठ - 100 टक्के जाऊ...

पूजा चव्हाण - बघा रं...

गबरुशेठ - होय..

पूजा चव्हाण - लवकर वापस या..मग..

गबरुशेठ - ठीकय...

पूजा चव्हाण - लगेच निघा...काम झाल्या झाल्या...मग जाऊयात...

गबरुशेठ - बरं...

पूजा चव्हाण - पुणे, मुंबई बस झालं आता...

पूजा चव्हाण - त्यांना म्हणावं...आधीच काडीयत..वाळून जाता म्हणावं..

गबरुशेठ - मग...

पूजा चव्हाण - खरं हाय का नाही...

गबरुशेठ - खरंय...खरंय..

पूजा चव्हाण - वाळून जाताल म्हणावं...उंच आहात..नाहीतर काय?

गबरुशेठ - खाऊ पिऊ घालत नसाल...

पूजा चव्हाण - बघा ना...काय माहित...विचारा त्यांना..

गबरुशेठ - तुमच्यामुळंच झालं ना...

पूजा चव्हाण - माझ्यामुळं कशाला...मी थोडीच त्यांना खाऊ पिऊ घालते..

गबरुशेठ - असंय का?

पूजा चव्हाण - मी ज्यादिवशी डबा देते ना....त्यादिवशी त्यांचं पोट पुढे येतं...

गबरुशेठ - काय काय...

पूजा चव्हाण - मी ज्यादिवशी डबा देते ना....त्यादिवशी त्यांचं पोट पुढे येतं... बाकी मजेत असतं सगळं..

गबरुशेठ - तुमचंबी पोटं पुढं आलंय..म्हणं ना...

पूजा चव्हाण - कोणाचं...माझं नाहीरं बाबा..स्लीम झालीय मी आता..

गबरुशेठ - हाहाहाहा

पूजा चव्हाण - स्लीम झाले मी आता...

गबरुशेठ - बरं..चालतंय...मग बाकी?

पूजा चव्हाण- बाकी काय निवांत...गच्चीवर उभी ठाकलीय... बघा हवा यायलीय मस्त...

गबरुशेठ - जास्त वेळ बोलू शकत नाही...

पूजा - हा सोबत माणसं आहेत ना...

गबरुशेठ - हो..हो..

पूजा चव्हाण - कळलं कळलं...झोपते मग मी...

गबरुशेठ - सकाळी बोलतो...

पूजा चव्हाण - ऐकलं बरं तुमचं... आता झोपते मी..

गबरुशेठ - हो..हो...झोपा झोपा..

पूजा चव्हाण - आणि त्यांना सांगा फोन करु नका....झोपू द्या...

गबरुशेठ - बरं बरं..फोन नाही करणार..ठीक आहे..

पूजा चव्हाण - हम्म्म...बाय..गुड नाईट..स्वीट ड्रीम.. टेक केअर..

गबरुशेठ - बाय..गुड नाईट..स्वीट ड्रीम.. टेक केअर..ओके बाय...

संजय राठोड यांनी थेट पोहरादेवीच्या गडावर जाऊन आपण निर्दोष असल्याचा दावा केला. पण आज आलेले फोटो आणि व्हायरल झालेली नवी ऑडिओ क्लिप संशयाचं जाळं आणखी घट्ट करणारी आहे.

संबंधित बातम्या