मुंबई : अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन तीन फेरी पूर्ण होऊन सुद्धा अजूनही मुंबई विभागात साधारणपणे 70 हजार विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले नसून ते अजूनही कॉलेजच्या प्रतीक्षेत आहेत. पसंतीच्या कॉलेजसाठी धरलेला आग्रह, तांत्रिक अडचणी अशा कारणांमुळे विद्यार्थी अजूनही कॉलेज मिळावं यासाठी विशेष फेरीची वाट पाहत आहेत. जेणेकरून आपल्या पसंतीचा कॉलेज या फेरीत तरी मिळेल, अशा आशेनं अनेक विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. मात्र, खरंच नामांकित कॉलेजला या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीनंतर प्रवेश मिळणार का? या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश घेताना या विशेष फेरीकडे कसा पाहायला हवं? या संदर्भात जाणून घेऊया.


FYJC Admission : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मुंबईत नामांकित कॉलेज कट ऑफ नव्वदी पार


दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अकरावी  प्रवेशाच्या तिन्ही फेरीमध्ये नामांकित कॉलेजचा कट ऑफ 90 टक्यांच्या पार होता. त्यात हजारो विद्यार्थ्यांचे गुण सुद्धा नव्वदीपार आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांनी नामांकित कॉलेज मिळाले नाही त्यांनी दुसऱ्या फेरीत आणि तिसऱ्या फेरीत सुद्धा नामांकित पसंतीच्या कॉलेजचा आग्रह धरला. परिणामी विद्यार्थ्यांना अजूनही हवे ते कॉलेज मिळाले नाही आणि जवळपास 70 हजार विद्यार्थी मुंबई विभागात अजूनही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे. 
 
एकूण विद्यार्थी ज्यांनी ऑनलाइन ऑफलाइन अकरावी प्रवेशासाठी अर्ज केला होता -2,32,281


आतापर्यत तिन्ही प्रवेश फेऱ्यामध्ये झालेले प्रवेश -1,30,651


अजूनही तीन फेऱ्यामध्ये सहभागी होऊन कॉलेज न मिळालेले साधारणपणे विद्यार्थी 70,000


रिक्त जागा- 1,69,843


ही आकडेवारी पाहिली तर अकरावी प्रवेश प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहेत कारण एकूण विद्यार्थी संख्येपेक्षा रिक्त जागा अधिक आहेत मात्र कॉलेज मिळवण्यासाठी पसंतीच्या कॉलेजचा आग्रह विद्यार्थ्यांना सोडावा लागेल... शिवाय, काही नामांकित कॉलेजच्या रिक्त जागा सुद्धा आता बोटावर मोजण्याएवढे शिल्लक आहेत


साधारणपणे सत्तर हजार विद्यार्थी ज्यांना कॉलेज अद्याप प्राप्त झालेलं नाही असे तरी दिसत नसलं तरी त्यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी अकरावीमध्ये प्रवेश घेणारे नाहीत कारण यातील काही विद्यार्थी आयटीआय पॉलिटेक्निक सारख्या अभ्यासक्रमांना सुद्धा प्रवेश घेतील... चौथा विशेष फेरीचे आयोजन ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले नाही अशा साठी केला असताना या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना एखादा विशिष्ट कॉलेज आग्रह न धरता कॉलेजचा कट ऑफ पाहून कॉलेजचे पर्याय अर्ज भरताना 20 सप्टेंबर द्यायचे आहेत


अकरावी प्रवेशाच्या 3 ऑनलाईन फेऱ्या नंतर सुद्धा 70 हजार विद्यार्थी प्रवेशापासून अजूनही वंचित आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पसंतीच्या कॉलेजसाठी केला जाणारा आग्रह. आता या विद्यार्थ्यांसाठी चौथ्या विशेष फेरीचे आयोजन केले आहे. त्यामुळे या फेरीमध्ये तरी विद्यार्थ्यांनी हा कॉलेजचा आग्रह करू नये असे आवाहन केले जात आहे. मोठ्या संख्येने प्रवेशाच्या रिक्त जागा उपलब्ध असल्याने अकरावी प्रवेशाची चिंता बाळगू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.