Mumbai: गेले दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या विलेपार्ले (Vile Parle) येथील गोविंदाचा नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) आज मृत्यू झाला आहे. संदेश दळवी असं मृत मुलाचं आहे. तो शिवशंभो गोविंदा पथकाचा गोविंदा होता. दहीहंडीत संदेश जखमी झाला होता. त्याला नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले येथील गोविंदा कार्यक्रमात संदेश सातव्या थरावरून कोसळला होता. त्याला उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. पण उपचारदरम्यान त्याचा आज मृत्यू झाला. दरम्यान दहिहंडीत डोक्याला मार लागून दोन गोविंदा गंभीर जखमी झाल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल झाला होता. विलेपार्ले पोलिस ठाण्यात हा गुन्हा आयोजांवर शनिवारी दाखल करण्यात आला होता.
10 लाख रुपयांची मदत देणार : गिरीश महाजन
यावरच बोलताना राज्याचे क्रिडामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, सातव्या थरावरुन मुलगा खाली कोसळला आहे. मानेला आणि मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. रविवारी त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी त्याच निधन झाल्याचं कळतं आहे. गोविंदाचे प्राण गमावणे ही दूर्दैवी घटना असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच शासनाने जाहीर केल्या प्रमाणे त्याच्या कुटुंबियांना 10 लाख देणार असल्याचं ते म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, घरची परिस्थिती पाहून आणखी मदत करता येईल का? हे देखील बघतआहोत. आयोजकांनी नियमावलीचं पालन केलं की नाही याची देखील चौकशी करू, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांनी राज्यात निर्बंधमुक्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला, तर दुसरीकडे दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबईसह ठाण्यात एकूण 222 गोविंदा जखमी झाले होते. त्यापैकी 197 गोविंदांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तर 25 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Shivsena : राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत अजूनही अनिश्चितता, सर्वोच्च न्यायालयाच्या उद्याच्या कामकाजामध्ये समावेश नाही
Wardha : थोरल्याने आई -वडिलांना घराबाहेर काढलं, धाकट्याने जिवंतपणीचं स्मशान दाखवलं;वर्ध्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना