मुंबई : सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंगळवारी पहाटे पोहोचणाऱ्या भक्तांकरता एक आनंदाची बातमी आहे. आजपासून दर सोमवारी मध्यरात्री 12 वाजेपासून ते मंगळवार रात्री 12 वाजेपर्यंत एल्फिन्स्टन स्टेशनवरुन मंदिरापर्यत मोफत विशेष बससेवेची सुविधा देण्यात येणार आहे.
सध्या माघी गणेशोत्सव सुरु आहे, यानिमित्ताने सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी याबद्दलची माहिती दिली.
आज (सोमवार) रात्री १२ वाजता या सेवेचा शुभारंभ सिद्धिविनायक मंदीर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते होणार आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या या उपक्रमामुळे दर मंगळवारी मोठ्या संख्येने येणाऱ्या गणेशभक्तांना मोठी सुविधा मिळणार आहे.
सिद्धिविनायक भक्तांसाठी मोफत बससेवेची सोय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jan 2018 11:34 PM (IST)
आजपासून दर सोमवारी मध्यरात्री 12 वाजेपासून ते मंगळवार रात्री 12 वाजेपर्यंत एल्फिन्स्टन स्टेशनवरुन मंदिरापर्यत मोफत विशेष बससेवेची सुविधा देण्यात येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -