CBI Raid on Sanjay Pandey House : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या घरावर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईसह चंदीगड येथील संजय पांडे यांचं घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात सीबीआयनं तीन गुन्हे दाखल केले आहेत. एनएसई घोटाळाप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशी सुरु झाली आहे. सीबीआयनं संजय पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगडमधल्या घरी छापेमारी केली. मुंबईत जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी सुरु आहे. एनएसई घोटाळ्यातील आरोपी चित्रा रामकृष्णन यांनी संजय पांडे यांना एनएसईशी संबंधित लोकांचे फोन रेकॉर्ड करण्यात सांगितलं असा आरोप होतोय. 


एनएसईशी संबंधित व्यक्तींचे फोन टॅप केल्याचा आरोप प्रकरणी संजय पांडे यांच्या मुंबई, चेन्नई आणि चंदीगड येथील घर आणि कार्यालयावर सीबीआयकडून छापेमारी करण्यात येत आहे. याआधी ईडीनेही त्यांना समन्स बजावलं होतं, त्यानंतर आता सीबीआयच्या या कारवाईमुळे संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय पांडे यांनी एनएसई घोटाळ्यातील मुख्य आरोपी चित्रा रामकृष्णन यांच्या सांगण्यावरून फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे.


संजय पांडे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. संजय पांडे महाविकास आघाडीच्या सांगण्यावरून सूड बुद्धीनं भाजपच्या नेत्यांवर कारवाई करतंय, असा आरोप करण्यात आला होता. यामध्ये मोहित कम्बोज, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या या नेत्यांविरोधात सूड बुद्धीनं कारवाई केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली होती. त्या नंतर आता केंद्री गृहमंत्रालायाच्या आदेशानंतर या प्रकरणात चौकशी सिरि झाली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या