मुंबई : बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भावेर्यात अडकलेले माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या विरोधातील बलात्काराचा गुन्हा रद्द करा, अशी विनंती करत त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. येत्या 9 मार्चला या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. मीरा-भाईंदरमधून भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पक्ष सदस्यत्वाचा काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपच्याच एका नगरसेविकेने मेहता यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
2014 सालानंतर याप्रकाराविरोधात आपण नरेंद्र मेहतांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मेहतांची जवळीक असल्याने ते आपल्यावर दबाव टाकत होते. त्यामुळे आजवर तक्रार दाखल केला नाही, असा दावा पीडित नगरसेविकेने केला आहे. तसेच नरेंद्र मेहतांकडून आपल्या व आपल्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचे पत्र कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना पीडितेनं दिलं असून कारवाईची मागणी केली आहे.
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर भाजप नगरसेविकेचे गंभीर आरोप, पोलिसात तक्रार दाखल
गेल्याचा आठवड्यात अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटले होते. माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात कारवाईची जोरदार मागणीही करण्यात आली. त्यानंतर नरेंद्र मेहता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अटकेची शक्यता असल्याने मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.
महिला नगसेविकेने नरेंद्र मेहतांवर काय आरोप केलेत?
भाजपच्या नगरसेविकने माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविकेने केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून न्याय न मिळल्याने पोलिसांकडे धाव घेतल्याचं पीडित नगरसेविकेने म्हटलं आहे. त्यामुळेचे आपण आमदार नरेंद्र महेतांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पीडित नगरसेविकेने स्वत: मेहता यांचं स्टिंग आॅपरेशन केलं होतं. हा व्हिडीओ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवून देखील दखल न घेतल्यानं त्या नाराज होत्या. अखेर त्यांनी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला.