मुंबई : निर्माती एकता कपूरच्या वेब सीरिजमध्ये भारतीय सैन्याचा अवमान केल्याची दृश्ये दाखवल्यानंतर देशभरातून विशेषत: सैन्य अधिकारी, सैनिकांकडून एकता कपूरच्या अटकेची मागणी केली जात आहे. अशा परिस्थितीत आता भविष्यात या सारख्या अश्लील, अशोभनीय, अपमानास्पद वेब सीरिज प्रसारित होणार नाहीत, म्हणूनच वेब सीरिज सेन्सॉर बोर्डाच्या अधिपत्याखाली आणाव्यात अशी मागणी केली जात आहे. आता ही मागणी भारतीय सैन्याचे माजी ब्रिगेडियर आणि लोकसभेचे माजी खासदार सुधीर सावंत यांनी केली.
सावंत यांनी या प्रकरणात महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट घेऊन एकता कपूर यांच्या अटकेची मागणी केली आहे. सावंत हे आता राज्यपाल तसेच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री यांना भेटणार आहेत आणि सेन्सॉर बोर्डाने वेब सीरिजही सेन्सॉर करणार करावी अशी मागणी ते यावेळी करणार आहेत. सावंत म्हणाले, 'एकता कपूरने जे काही केले तो गुन्हा आहे आणि अशा गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. त्याच वेळी, हा अशा प्रकारचा अश्लीलपणा देशातील नागरिकांमध्ये पसरू नये, म्हणून आम्ही वेब सिरीज सेन्सॉर बोर्डाच्या अधिपत्याखाली आणण्याची मागणी करणार आहोत. जेणेकरून भविष्यात एकता कपूर सारखे कोणी व्यक्ती अशी अश्लीलता दाखवत देशाचे वातावरण खराब करू नये.'


'अबू सालेमसोबत सोनू निगमचे संबंध होते', दिव्याचा इन्स्टाद्वारे पलटवार
यासंदर्भात मुंबईच्या खार पोलीस ठाण्यासह देशातील इतर काही पोलीस ठाण्यांमध्ये एकता कपूर आणि अल्ट (ALT) बालाजी यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या तक्रारींचा पोलीस तपास करत आहेत. सुधीर सावंत म्हणतात की, 'भारतीय सैन्य, देशाच्या सैन्याशी जोडलेला प्रत्येक नागरिक आणि पती पत्नीच्या पवित्र संबंधांची बदनामी करणारा हा प्रकार असल्याने यामध्ये एकता कपूर यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे'.

भारतीय जवानांविषयी आक्षेपार्ह दृष्य
या विषयात, एकता कपूरने यापूर्वीच सैन्यांची माफी मागितली आहे आणि हे दृश्य हटविले आहे. एकता कपूरच्या वेब मालिका XXX 2 मधील एक दृश्य जोरदार व्हायरल झालं होतं, हे पाहून लोक एकता कपूरविरोधात खूप भडकले होते, त्यांचा याविरोधात संताप पाहायला मिळाला. माजी सैन्य अधिकारी जवान आणि सध्याचे सैन्य अधिकारी जवान यांनीही याबाबत आक्षेप नोंदविला. या मालिकेचा एक भाग सैनिक आणि त्यांच्या वर्दीचा अपमान करतो. या आक्षेपार्ह दृश्यबद्दल एकता कपूर यांनी भारतीय सैन्यदलाची माफी मागितली आणि म्हटले - "आम्ही देशाच्या सैन्याचा आदर करतो." आमचे कल्याण आणि सुरक्षिततेत त्यांचे योगदान मोठे आहे. आम्ही चुकल्याबद्दल दिलगीर आहोत.'
सोशल मीडियातून बलात्काराच्या धमक्या
पण तरीही संतप्त लोकांनी एकता कपूर यांना पद्मश्री परत देण्याची मागणी केली. सोशल साइटवरही या प्रकरणात त्यांना धमक्या देण्यात आल्या. याची खंत व्यक्त करताना एकता म्हणाल्या, त्यांची आई, त्यांना आणि आपल्या मुलाला बलात्काराच्या धमक्या सोशल मीडियावर जाहीरपणे दिल्या. परंतु, या धमक्यांपासून त्या घाबरणार नाही आणि त्यांना सामोरे जाणार आहेत. एकता कपूर यांनी सोशल मीडियावरुन धमकी दिल्याबद्दल मुंबई पोलिसातही तक्रार केली आहे.

Usha Jadhav on Fair & Lovely | 'सावळ्या रंगाचा भेद वाईट', अभिनेत्री उषा जाधव