ED Summons to Sanjay Jaiswal : मुंबई : मुंबई महानगर पालिकेचे (BMC) तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल (Sanjiv Jaiswal) यांना ईडीनं (ED) समन्स धाडलं आहे. मुंबई महानगर पालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी संजीव जैस्वाल यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. काही दिवसांपूर्वी ईडीकडून मुंबई पालिकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी संजील जैस्वाल यांच्याही घरी छापेमारी करण्यात आली होती. 


आयएएस अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडी अधिकाऱ्यांना जे रोख रकमा आणि मालमत्ता सापडल्या आढळून आल्या आहेत. यापैकी बहुतेक मालमत्ता या संजीव जैस्वाल आणि त्यांच्या पत्नीशी संबंधित आहे. सुत्रांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे आता आयएएस अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ईडीनं काही दिवसांपूर्वी मुंबईत 15 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली होती. याचप्रकरणी ईडीनं आता मुंबई महानगर पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांना चौकशीसाठी समन्स धाडलं आहे. 


ईडी छापेमारीत आढळल्या 15 कोटींच्या मुदत ठेवी


ईडीकडून करण्यात आलेल्या छापेमारीत काही रोख रकमा आणि मालमत्तांसंदर्भातील कागदपत्र ईडीच्या हाती लागली आहेत. जैस्वाल यांच्या पत्नीकडे मढ आयलँड अर्धा एकर भूखंड आणि 34 कोटी रुपयांचे अनेक फ्लॅट्स अशा सुमारे 24 मालमत्ता आहेत आणि 15 कोटींच्या एफडी आहेत. एका आयएस अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती आली कुठून? याचासुद्धा तपास ईडीकडून केला जाणार आहे, माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.


कोविड घोटाळा प्रकरणी ईडीकडून संजीव जयस्वाल यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांना गुरुवारी चौकशीसाठीसुद्धा बोलवण्यात आलं होतं. मात्र काही महत्त्वाच्या कामांत असल्यामुळे संजीव जैस्वाल चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे आता ईडीनं त्यांना पुन्हा एकदा समन्स धाडलं आहे. 


कथित कोविड सेंटर घोटाळ्याशी संजीव जैस्वाल यांचा संबंध काय?


ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस हॉस्पिटलच्या टेंडर बोलीच्या वेळी संजीव जैस्वाल अतिरिक्त महापालिका आयुक्त होते आणि महत्त्वाचं म्हणजे स्थापन करण्यात आलेल्या समितीचा भाग होते. ज्यांनी लाईफलाईन हॉस्पिटलला मॅनेजमेन्ट सर्व्हिसेस कंपनीला टेंडर दिलं. 


टेंडर प्रक्रियेवेळी ज्या कंपनीला हे कंत्राट द्यायचं आहे, त्या कंपनीकडे पूर्वीचा अनुभव आणि पात्रता याचा विचार करून एक कंत्राट देणं क्रमप्राप्त होतं. मात्र तपासात या कंपनीला पुरेसा अनुभव नसताना शिवाय या कंपनीकडे रुग्णसेवेसाठी पुरेशी मनुष्यबळ आणि साहित्य उपलब्ध नसतानासुद्धा या कंपनीला कंत्राट देण्यात आलं. 


आता संजीव जैस्वाल यांनी असं असतानासुद्धा या कंपनीला कंत्राट का दिलं? याची ईडीकडून कसून चौकशी करत आहे. संजीव जैस्वाल यांच्याशी काही इतर महानगर पालिका अधिकारी यांच्या घरीसुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. जैस्वाल व्यतिरिक्त, ईडीनं महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार आणि बीएमसीचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावरही छापे टाकले आहेत. जे केंद्रीय खरेदी विभागात होते, ज्यांनी रुग्णालयांना ऑक्सिजन आणि इतर साहित्य पुरवठ्यासाठी समन्वय अधिकारी होते.