Ashadhi Ekadashi 2023 : संपूर्ण राज्यभरात आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2023) सोहळ्याचा उत्साह मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पडला. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मोठा मेळा भरलेला पाहायला मिळाला. तर, मुंबईतही अनेक ठिकाणी विठ्ठल मंदिर भाविकांनी गजबजलेली पाहायला मिळाली. आषाढी एकादशीनिमित्त राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटीही विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले पाहायला मिळाले. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील मुंबईतील सायन परिसरातील विठ्ठल मंदिरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेतलं. 


आषाढी एकादशी निमित्ताने राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटीही विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले पाहायला मिळाले. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनीदेखील मुंबईच्या सायन स्टेशनजवळ असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावली. अमिताभ बच्चन यांनी तब्बल अर्धा तास मंदिरात विठोबाची पूजा आणि आरती केली. या निमित्त अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळाले. 


बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन दरवर्षी सायन स्टेशनजवळ असलेल्या या विठ्ठल मंदिरामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. यावर्षी देखील त्यांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात आवर्जून हजेरी लावली. तसेच, यावेळी मंदिर प्रशासनाकडून अमिताभ बच्चन यांचा सत्कारही करण्यात आला.


आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) सोहळा राज्यात नुकताच पार पडला. या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत भाविकांनी विठोबाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून वारकरी पंढरपुरात विठोबाच्या दर्शनासाठी दाखल झालेले पाहायला मिळाले. तसेच, विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तीत तल्लीन झालेले वारकरीही यावेळी पाहायला मिळाले.


'कौन बनेगा करोडपती 15' चा नवा प्रोमो रिलीज


बिग बी अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेला 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा शो केवळ भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत लोक हा कार्यक्रम अगदी आवडीने आणि आवर्जून पाहतात. या कार्यक्रमाचा प्रत्येक सीझन हिट ठरला आहे. नुकताच या कार्यक्रमाचा 15 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कौन बनेगा करोडपती-15'चा एक नवा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअरही करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच, शो च्या प्रोमोनुसार, 'कौन बनेगा करोडपती-15' मध्ये काही ट्विस्ट असेल असाही अंदाज नेटकरी लावत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या :


Ashadhi Wari : 'जय हरी विठ्ठल' म्हणत पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिल्या एकादशीच्या शुभेच्छा! नक्की काय म्हणाले मोदी?