माहिती आणि प्रसारण मंत्रायलाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, एनडीटीव्ही इंडियाला 9 नोव्हेंबरला दुपारी एकपासून ते 10 नोव्हेंबर दुपारी एक वाजेपर्यंत आपलं प्रसारण बंद ठेवावं लागणार आहे.
दरम्यान, एखाद्या न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई करण्यात येत आहे.
पठाणकोट हल्ल्यावेळी एनडीटीव्ही इंडियानं एअरबेसवर असणाऱ्या हत्यारांची माहिती दिली होती.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीच्या मते, 'अशाप्रकारची माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करणं हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं घातक आहे. तसेच त्यावेळी दहशतवाद्यांना सूचना देणारे या माहितीचा वापर करु शकत होते.' असं या समितीचं म्हणणं आहे.
सरकारच्या या आदेशानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करुन सरकारवर निशाणा साधला आहे. 'सुन लो सारे चैनल वालों। अगर मोदी जी की आरती नहीं उतारी तो आपका चैनल भी बंद कर देंगे।' अशी खोचक टीका त्यांनी मोदी सरकारवर केली आहे.