राहुल मुसळे असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. राहुल आणि त्याच्या दोन साथीदारांचा स्टेशनबाहेरील खेळणे विक्रेत्याशी वाद झाला. आसनगावचे रहिवासी असलेल्या राहुल मुसळे यांनी खेळण्याची बंदूक घेतली आणि पैस न देताच ते स्टेशनच्या दिशेनं निघाले.
जेव्हा विक्रेता आपल्या पाठीमागे येत आहे, हे त्यांच्या ध्यानात आलं, तेव्हा मुसळे थेट रेल्वे रुळांवर उतरले, तर साथीदारांनी ब्रिजच्या दिशेने पोबारा केला. मुसळे रेल्वे रुळावर उतरल्यावर समोरुन ट्रेन येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र त्यांनी पुन्हा वर येईपर्यंत ट्रेनने त्यांना धडक दिली होती.
ट्रेनच्या धडकेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 27 ऑक्टोबरला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. मुसळेंसोबत असलेल्या साथीदारांना त्यांच्या अपघाताची कल्पनाही नव्हती. दुसऱ्या दिवशी त्यांना मुसळेंचा मृत्यू झाल्याचं वृत्त पोलिसांकडून समजलं.
पाहा व्हिडिओ : (या व्हिडिओतील दृश्यं तुम्हाला विचलित करु शकतात)