मुंबई : संततधार पावसाचा मुंबईतील लोकल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. अंधेरी स्टेशनवर विलेपार्ले एंडच्या बाजूने प्लॅटफॉर्म क्र. 8 आणि 9 च्या दरम्यान पुलाचा फुटपाथ कोसळल्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही दिशेची वाहतूक सध्या ठप्प आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा गोखले ब्रिज आहे. पुलाच्या बाजूचा फुटपाथ कोसळला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

अंधेरी पूल दुर्घटना : आतापर्यंत काय-काय घडलं?

- सकाळी साडे सात वाजता गोखले पुलाचा फुटपाथ कोसळला

- ओव्हरहेड वायर तुटल्या.

- पश्चिम रेल्वेची संपूर्ण वाहतूक बंद

- घटनेत दोन जण जखमी, एक जण अडकल्याची भीती

- चर्चगेट ते वांद्रे, विरार ते गोरेगावपर्यंत वाहतूक सुरु

- ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या.

- ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या.

- पूल 1960 साली बांधल्याची माहिती

- एनडीआपएफ, अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरु

सकाळी पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर पुन्हा काही भाग कोसळला. त्यामुळे ढिगारा काढण्याचं जे काम सुरु आहे, ते आणखी लांबण्याची शक्यता आहे.

फलाट क्रमांक 8 आणि 9 यांच्यामधील हा ब्रिज होता. तो कोसळला. हा पूल खूपच जीर्ण झाला होता, त्याला लोखंडाचा सपोर्ट दिला होता. मात्र आज सकाळी साडेसातच्या सुमारास तोही कोसळला.

ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या.

ब्रिज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. पावसामुळे हा ढिगारा काढणं मोठं जिकीरीचं काम आहे.

ब्रिज कोसळल्याने जीवितहानी झालेली नाही. दोघे जखमी झालेले आहेत. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे वाहतूक सुरु करणं हे मोठं आव्हान आहे.

घटनेतील महत्त्वाचे मुद्दे

प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 दरम्यान हा भाग कोसळला

घटनेत दोन जण जखमी

रेल्वेच्या ओव्हरहेड वायर तुटल्या, रेल्वे वाहतूक ठप्प

ढिगारा काढण्याचं काम सुरु

गोखले पुलावरुन सध्या रस्ते वाहतूक बंद

रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे बोरीवलीहून चर्चगेटकडे आणि चर्चगेटहून बोरीवलीकडे या दोन्ही बाजूची रेल्वे सेवा सध्या बंद आहे. प्रवाशांना भर पावसात पायी जावं लागत आहे. सकाळी सात वाजून 35 मिनिटांनी ही घटना घडली.

LIVE : अंधेरीत ब्रिजचा फुटपाथ कोसळला, रेल्वे वाहतूक ठप्प

पुलाचं कोसळलेला भाग बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणखी किती वेळ लागेल, याबाबत अजून माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेचं काही प्रमाणात नुकसान झालं असल्याचीही शक्यता आहे.

कोसळलेला पूल नेमका रेल्वेचा होता, की मुंबई महापालिकेने बांधलेला होता, याची माहिती आता घेतली जाणार आहे. सध्या तरी रेल्वेकडून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. पुलाचा भाग बाजूला करण्यासाठी पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

दहिसर आणि विरारकडून येणाऱ्या गाड्या केवळ बोरीवलीपर्यंत चालवल्या जात आहेत. तर ट्रॅकवरच पुलाचा भाग कोसळल्यामुळे चर्चगेटकडून येणाऱ्या गाड्या विलेपार्ले स्टेशनपर्यंत चालवण्यात येत आहेत.

मुंबईसह उपनगरात कालपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्याचाच फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसत आहे.