मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर झाली. यामध्ये मुंबईतील अनेक नामांकित कॉलेजेसची कट ऑफ 90 टक्क्यांच्या पार गेल्याचं पाहायला मिळालं. अनेक कॉलेजच्या कट ऑफ मध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 1 ते 2 टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे.


दोन लाख 3 हजार 120 विद्यार्थ्यांनी पहिल्या गुणवत्ता यादीसाठी अर्ज केला होता. यामध्ये 1 लाख 20 हजार 568 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत महाविद्यालयं मिळाली आहेत. तर 35 हजार 787 जणांना पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालं आहे. कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना 6 ते 9 जुलै दरम्यान आपले प्रवेश कॉलेजमध्ये जाऊन निश्चित करायचे आहेत.

कट ऑफ 2018-19

मिठीबाई कॉलेज

आर्टस् - 87.2 टक्के
सायन्स - 88. 4 टक्के
कॉमर्स - 90.33 टक्के

मागील वर्षीच्या तुलनेत वाढ

सायन्स - 3 टक्के
कॉमर्स - 3 टक्के
आर्टस् - 4 टक्के

रुईया कॉलेज

आर्टस् - 92.2 टक्के
सायन्स - 93.2 टक्के

मागील वर्षीच्या तुलनेत वाढ

आर्टस् - 2 टक्के
सायन्स - 1 टक्का

के सी कॉलेज

कॉमर्स - 90.20 टक्के
आर्टस् - 86 टक्के
सायन्स - 87 टक्के

मागील वर्षीच्या तुलनेत वाढ

सायन्स - 2 टक्के
कॉमर्स - 2 टक्के
आर्टस् - 3 टक्के

जय हिंद कॉलेज

कॉमर्स - 90.66 टक्के
आर्टस् - 89.8 टक्के
सायन्स - 85.83 टक्के

एचआर कॉलेज

कॉमर्स - 92 टक्के

झेवियर्स कॉलेज

आर्टस् - 94.2 टक्के
सायन्स - 90.4 टक्के

वझे केळकर कॉलेज

आर्टस् - 86.8 टक्के
सायन्स - 93 टक्के
कॉमर्स - 90.8 टक्के

रुपारेल कॉलेज

आर्टस् - 86 टक्के
कॉमर्स - 91.8 टक्के
सायन्स - 89.6 टक्के

नरसी मुंजी कॉलेज

कॉमर्स - 94.2

हिंदुजा कॉलेज

आर्टस् - 74.2 टक्के
सायन्स - 87 टक्के
कॉमर्स - 89.2 टक्के