मुंबईत कुर्ल्याजवळ झोपडपट्टीला भीषण आग
एबीपी माझा वेब टीम | 07 Jan 2017 07:48 AM (IST)
मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील कपाडियानगरजवळ झोपडपट्टीत एका ठिकाणी भीषण आग लागली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. कारण आग कमी न होता वाढताना दिसत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.