मुंबईतील 'आरे'मध्ये गवताला आग, बाजूलाच पेट्रोल पंप
एबीपी माझा वेब टीम | 02 Mar 2017 12:11 PM (IST)
मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात आरेजवळील गवताला आग लागली आहे. बाजूलाच पेट्रोल पंप असल्याने आग वाढण्याची भीती आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहे. आग पेट्रोल पंपापर्यंत पोहचू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. गोरेगाव पश्चिम एक्सप्रेस हायवेजवळ लागलेल्या या आगीचा धूर लांबून दिसत आहे. आग कशामुळे लागली, याचा सध्या शोध घेतला जातोय.