बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट यांना संदीप साहूनं 50 लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिली होती. महेश भट यांनी या संदर्भात जुहू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
फोनवरुन संदीप साहूनं ५० लाख रुपयांची मागणी केली होती. जर, हे पैसे दिले नाही तर मुलगी आलिया भट आणि पत्नी सोनी राजदान यांना मारण्याची धमकी दिल्याची तक्रार महेश भट यांनी दिली होती.
आरोपीनं सुरुवातीला महेश भट्ट यांना फोन केला होता. पण त्याच्या या धमकीकडे महेश भट्ट यांनी फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण त्यानंतर धमकीचे अनेक मेसेज महेश भट्ट यांना पाठवण्यात आले. त्यानंतर मात्र, महेश भट्ट यांनी पोलिसात धाव घेतली
यासंदर्भात महेश भट यांनी ट्विटही केलं होतं, या प्रकरणात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी लक्ष घालावं असं आवाहन त्यांनी केलं होतं.