Mankhurd Fire news : मुंबईतील मानखुर्दमधील मंडळ परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळं परिसरात उंच धुराचे लोट दिसत आहेत. दरम्यान, अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मानखुर्दमधील  हा मंडळ परिसरात विविध प्रकारची गोडाऊन आहेत. या परिसरात तेलाची गोडाऊन, साबन बनवण्याचे कारखाने, कागद बनवणे, फर्निचर बनवण्याचे कारखाने देखील परिसरात आहेत.

Continues below advertisement




मानखुर्द मधील मंडळ परिसरात लागलेली आग ही भीषण आहे. सुदैवाने याठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, लागलेल्या आगीमुळं मोठं नुकसान झालं आहे. लांबूनच मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसून येत आहेत. अग्निशामक दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. मुंबई पालिकेचे अधिकारी दाखल झाले आहेत. दरवर्षी याठिकाणी आगीच्या घटना घडतात. कारण याठिकाणी अनाधिकृतपणे तेलाचे साठे याठिकाणी आहेत. मात्र, याठिकाणी कोणताही कारवाई केली जात नसल्याचे समोर आले आहे.