मुंबई : मुंबईमधील वाळकेश्वर परिसरातील ‘लिजेंड’ या इमारतीतील एक फ्लॅटला आज (सोमवार) दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली होती. पण वेळीच अग्निशमन दलानं ही आग विझवली.
ही इमारत 31 मजल्यांची असून 17 आणि 18 व्या मजल्यावरील डुप्लेक्स फ्लॅटला आग लागली होती. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या.
या इमारतीतील अनेक फ्लॅट हे सध्या रिकामेच आहेत. पण काही फ्लॅटमध्ये केअर टेकरही होते. त्यामुळे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील लोकांना बाहेर काढलं होतं.
दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली होती याबाबत मात्र कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.