मुंबई : भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड येथील यंत्रमाग कारखान्यास भीषण आग लागली असून कारखान्याच्या वरच्या मजल्यावर कच्च्या कापड गोदामाला आग लागली आहे. यंत्रमाग कारखाना व पहिल्या मजल्यावरील कापड जळून खाक झालं असून आगीत लाखो रूपयांचं नुकसान झालं आहे.
यंत्रमाग कारखान्याला अचानक लागलेल्या आगीत कापड व यंत्रमाग जाळल्याची घटना भिवंडीतील खोखा कंपाउंड येथे घडली आहे. या आगीत लाखो रुपयांचा कच्चं आणि पक्कं कापड जळून खाक झालं आहे. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आज शुक्रवार असल्याने सर्व यंत्रमाग कारखाने बंद होते त्यामुळे आग लागल्याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.
आग लागलेल्या कारखान्याच्या मालकाचे नाव महेंद्र जैन असे असं आहे. शहरातील खोखा कंपाऊंड येथे यंत्रमाग कारखाना आहे. या कारखान्याला दुपारी अचानक आग लागली कारखान्याला लागलेल्या या आगीमुळे कारखान्यात वरच्या मजल्यावर ठेवण्यात आलेले कच्चं आणि पक्कं कापड तसेच यंत्रमाग यंत्र जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या व खाजगी पाण्याचे टॅन्कर घटनास्थळी दाखल झाले होते. या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही दोन तास लागणार असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .
दरम्यान, मार्च एन्डिग जवळ आलं की, भिवंडीतील यंत्रमाग कारखाने, डाईंग सायजिंग, केमिकल गोदामे यांना आगी लागण्याचे सत्र सुरु होते, त्यामुळे या आगी नेमक्या लागतात की लावल्या जातात, असा संशय नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मॉडेल आणि अभिनेत्रींना अटक
झेडपीनंतर राज्यातील महापालिका पोटनिवडणुकीतही भाजपला धक्का
नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारी टोळी अटकेत, 139 लिटर दूध जप्त