मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबईतील मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांच्यावर महिलेला आक्षेपार्ह मेसेजेस पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादरमध्ये पत्नीचा प्रचार करण्यासाठी सुधीर जाधव तक्रारदार महिलेच्या घरी गेले होते. त्यानंतर दारुच्या नशेत व्हॉट्सअॅपवरुन जाधव यांनी रात्रभर आक्षेपार्ह मेसेज आणि व्हिडीओ कॉल केल्याचा आरोप महिलेने केला आहे. आपला पूर्ण फोटो पाठवण्याचा आग्रह जाधव यांनी केल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे.
त्यानंतर पोलिस तक्रार करु नये म्हणून आपल्याला धमकावण्यात आल्याचंही महिलेनं म्हटलं आहे. दादर पोलिस स्टेशनमध्ये कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव यांना वॉर्ड क्रमांक 192 मधून मनसेनं उमेदवारी दिली आहे.