नालासोपारा (ठाणे) : नालासोपाऱ्यात 50 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली काँग्रेस नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद चौबे असं त्याचं नाव आहे. तो वसई-विरार शहर काँग्रेसचा सरचिटणीस आहे.


 

आनंद चौबेचा बांधकामाचा व्यवसाय आहे. यातूनच पीडित महिलेशी त्याची ओळख झाली. त्यानंतर आनंद चौबेनं महिलेला घर आणि दुकान घेऊन देण्याचं आमिष दाखवलं. शिवाय तिच्याकडून 11 लाख रोख, 7 तोळं सोनं आणि तीन किलो चांदीची बिस्किटं असा मुद्देमालही लाटला.

 

यादरम्यान आनंद चौबेनं तिला आपल्या जाळ्यात ओढून अनैसर्गिक अत्याचार केल्याचाही आरोप आहे. संबंधित महिलेनं आनंद चौबेविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर आनंद चौबे फरार झाला आहे.