मुंबई : नवी मुंबई आणि ठाण्यातील दगडी खाणी सुरु करण्याबाबत कायदेशीर मार्ग काढा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. शिवसेनेने या मागणीसाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दगडी खाणी बंद असल्याने मुंबईतील रस्त्याचे कामं रखडले आहेत. त्यासाठी तातडीने दगडी खाणी सुरु कराव्यात, अशी मागणी शिवसेनेने केली.
पावासाळ्यापूर्वी मुंबईतील रस्त्याची कामं आटोपून घेणं गरजेचं आहे. मात्र खडी उपलब्ध नसल्याने कामं रखडली आहेत. दगडी खाणी सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
दरम्यान मुंबईतील खाजगी शाळांची फी वाढ हा गंभीर विषय असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले. फी वाढीचा मुद्दा आता हाती घेणार आहोत, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.