विरारमध्ये अडीच लाखांचा गुटखा जप्त, एफडीएची कारवाई
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2018 03:22 PM (IST)
विरारमधील फुलपाडा भागात अवैधरित्या साठवलेल्या गुटख्याच्या गोदामावर एफडीएने धाड टाकली.
मुंबई : विरारमध्ये अवैधरित्या साठवलेल्या गुटख्याच्या गोदामावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धाड टाकली. यामध्ये जवळपास अडीच लाख रुपये किमतीचा गुटखा सापडला. विरारमधील फुलपाडा भागात अवैधरित्या साठवलेल्या गुटख्याच्या गोदामावर एफडीएने धाड टाकली. हा गुटखा गैरमार्गाने मुंबई शहरभरात विकला जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. अन्न आणि औषध प्रशासनाला सापडलेल्या गुटख्याची किंमत दोन लाख 49 हजार रुपये असल्याची माहिती आहे. हा गुटखा ताब्यात घेतल्यानंतर ताबडतोब नष्ट करण्यात आला.