ठाणे : ठाण्यात दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. अशा दुःखच्या वेळी तिच्या कुटुंबाने तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्महत्या झाल्यानंतर तिच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी तिच्या कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयाने समाजाला एक आदर्श घालून दिला आहे.
ठाण्यातील बेडेकर विद्यामंदिरमध्ये 10 वीत शिकणाऱ्या रचना सूर्यकांत शिंगे हिने आत्महत्या केली. रचना अभ्यासात हुशार होती. शाळेतील आदर्श विद्यार्थिनी होती. दुपारी अचानक काही कारणास्तव तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे तिचे कुटुंब आणि बाळकुम गावावर शोककळा पसरली आहे.
अशा दुःखाच्या वेळी देखील तिचे वडील सूर्यकांत शिंगे यांनी तिचे नेत्रदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. रचनाला नेत्र रुपी जीवंत ठेवण्याच्या निर्णयाला रचनाच्या मित्र परिवराने आणि नातेवाईकांनी एक आदर्श असल्याचे सांगत, अशा गोष्टींचे अनुकरण नक्कीच झाले पाहिजे असे सांगितले.
रचना ही शाळेत खूप हुशार विद्यार्थिनी होती. खेळात, अभ्यासात आणि वक्तृत्व कलेत तिला नेहमी पारितोषिके मिळत होती. तिच्या आत्महत्येच्या माहितीनंतर शाळेतील शिक्षाकांनी देखील हळहळ व्यक्त केली. मात्र तिच्या वडिलांच्या या आदर्श निर्णयामुळे एका हुशार विद्यार्थिनीने समाजाला दिलेलं योगदान कौतुकास्पद असल्याचे बेडेकर विद्यालयतील तिच्या शिक्षकांनी सांगितले.
रचना हे जग सोडून का गेली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या जगात नसूनही ती हे जग पाहू शकेल. तिच्या वडिलांनी दुःखाच्या क्षणी आपण समाजाला काहीतरी देणे लागतो, हे समजून केलेले नेत्रदान हे रचनाला पुनर्जीवन देणारं आहे.
मुलीच्या आत्महत्येने दु:खाचा डोंगर, धाडसी वडिलांचा नेत्रदानाचा निर्णय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Feb 2018 11:52 AM (IST)
रचना ही शाळेत खूप हुशार विद्यार्थिनी होती. खेळात, अभ्यासात आणि वक्तृत्व कलेत तिला नेहमी पारितोषिके मिळत होती. तिच्या आत्महत्येच्या माहितीनंतर शाळेतील शिक्षाकांनी देखील हळहळ व्यक्त केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -