मुंबई : विरारमध्ये (Virar ) हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. दांडीया (Dandiya ) खेळताना मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूच्या धक्याने पित्याने आपले प्राण सोडले. मनीषकुमार जैन असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर नरपत जैन असं मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दांडिया खेळत असाताना शनिवार रात्री 35 वर्षीय मनीषकुमार जैन या तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने ( Heart Attack) मृत्यू झाला. डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि पिता पुत्रांचे रुग्णालयातच निधन झालं.
विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील एव्हरशाईन अवेन्यू या इमारतीमध्ये नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री दांडिया सुरू असताना मनीषकुमार जैन या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. त्याचे वडील नरपत जैन यांनी नागरिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र रिक्षामध्येच मनीषकुमारचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे बघताच त्याचे वडील नरपत जैन यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जैन कुटुंबियांचा सोन्याचे दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मयत मनीष जैन ज्याचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. मनिष वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता. नरपत जैन यांच विरार जैन समाजामध्ये चांगल प्रस्थ होतं. तसेच सोसायटीमध्ये देखील दोघांचही वागणं मनमिळाऊ होतं. त्यामुळे दोघांच्या मृत्यूने सोसायटीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. बुलढाण्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. दांडिया खेळत असताना एकाचा मृत्यू झालाय.
बुलढाण्यात दांडिया खेळताना एकाचा मृत्यू
दांडिया खेळत असताना हृदय विकाराचा तीव्र झटक्या आल्याने हॉटेल व्यावसायिक असणाऱ्या विशाल पडधरीया (47 वर्ष) यांचा मृत्यू झाल्याची घटना मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे रात्री घडली आहे. येथील पडधरीया कुटुंब गेल्या काही वर्षांपासून आपल्या घरासमोर देवी बसवत असतात. या देवी समोर रात्री दांडिया खेळत असताना विशाल दलीचंद पडधरीया यांना अचानक चक्कर आल्याने ते जमीनीवर कोसळले. त्यांना तत्काळ अनघा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मनमिळावू स्वभावामुळे विशाल पडधरीया यांचा मोठा मित्र परिवार असून त्यांच्या निधनाची वार्ता कळताच येथील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.
महत्वाच्या बातम्या