राज ठाकरेंच्या व्यंगचित्रावर आक्षेपार्ह कमेंट केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2018 06:48 PM (IST)
मनसेच्या महिला कार्यकर्त्या दुपारी या तरुणाच्या घरी गेल्या. तिथे त्याला दमबाजी करत मारहाण केली आणि त्याला माफीही मागायला लावली.
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रावर फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह कमेंट केल्याचा आरोप करत मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी एकाला मारहाण केली. विशेष म्हणजे या मारहाण करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांचा ठाणे मनसे जिल्हाध्यक्षांकडून सत्कारही करण्यात आला. बदलापूरचा विवेक भागवत हा तरुण नेहमी विरोधात आणि अपशब्द वापरुन कमेंट करत होता, असा आरोप मनसे कार्यकर्तांनी केला. मनसेच्या महिला कार्यकर्त्या दुपारी या तरुणाच्या घरी गेल्या. तिथे त्याला दमबाजी करत मारहाण केली आणि त्याला माफीही मागायला लावली. या प्रकारानंतर मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या महिला कार्यकर्त्यांचा सत्कारही केला. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी व्हिडीओ शूट करत या तरुणाला माफी मागायला लावली. सोशल मीडिया अकाऊंट बंद करेन, अशी जबरदस्तीने कबुलीही घेतली आणि अकाऊंट बंद करण्याच्या अगोदर तशी पोस्ट टाकण्याची मागणी केली. माफी मागणाऱ्या या तरुणाला मारहाण केल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. पाहा व्हिडीओ :