मुंबई : ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचपदाच्या निवडणुकीत उमेदवारांसाठी खर्च मर्यादा निवडणूक आयोगाने निश्चित केली आहे. सरपंचपदासाठीच्या उमेदवार निवडणुकीत 50 हजार रुपये ते 1 लाख 75 हजार रुपये खर्च करु शकतात.
सरपंचपदाच्या उमेदवारांना खर्च मर्यादा किती?
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या उमेदवारांसाठी सदस्यसंख्येनुसार 50 हजार रुपये ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे.
ग्रामपंचायत सदस्यपदाच्या उमेदवारांना खर्च मर्यादा किती?
ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाचे उमेदवार निवडणुकीसाठी 25 हजार रुपये ते 50 हजार रुपयांपर्यंत खर्च करु शकतात.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. सुधारणेनुसार नगराध्यक्षासारखाच आता सरपंचपद थेट जनतेतून निवडला जाणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकांसाठी 30 जुलै 2011 च्या आदेशानुसार सरसकट 25 हजार रुपयांची खर्च मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र, आता सदस्यांच्या संख्येनुसार बदल करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी खर्च मर्यादा :
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार किती खर्च करु शकतात?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2017 11:07 PM (IST)
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या उमेदवारांसाठी सदस्यसंख्येनुसार 50 हजार रुपये ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -