मुंबई : मुंबई मेट्रो -3च्या 26 स्थानांपैकी 13 स्थानकांचे काम शंभर टक्के काम पूर्ण झालं आहे. अवघ्या 19 महिन्यांमध्ये मेट्रो प्राधिकरणाने 50 टक्के भुयारीकरणाचा टप्पा पार केला आहे. या मार्गासाठी एकूण 56 किमी (अप आणि डाऊन)चे भुयारीकरण करायचे आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 हा मुंबईच नव्हे तर भारतातील सर्वात लांब संपूर्णत: भुयारी मेट्रो मार्ग आहे. भुयारीकरणाप्रमाणे खोदकाम, बेस स्लॅब, कॉनकोर्स स्लॅब, कॉलम तसेच भिंतींची बांधणी यासारखी कामे देखील युद्धपातळीवर सुरु आहेत.


मेट्रोचे खोदकाम पूर्ण झालेल्या स्थानकांमध्ये कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, सायन्स म्युझियम, सिद्धिविनायक, एमआयडीसी, मरोळ नाका, सहार रोड, सीएसएमआयए-आंतरदेशीय, सीएसएमआयए - आंतरराष्ट्रीय विमानतळ व सीप्झ या स्थानकांचा समावेश आहे. उर्वरित स्थानकांचे खोदकाम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. उर्वरित 13 स्थानकांचे खोदकाम मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. 13 स्थानकांचे काम 87 टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे.

Mumbai Metro | दहिसर-डीएन नगर, दहिसर-अंधेरी मेट्रो अखेर रुळावर | ABP Majha


उर्वरित स्थानकांच्या खोदकामाचा तपशील पुढील प्रमाणे:

1. काळबादेवी स्थानक- 26%
2. गिरगाव स्थानक- 14%
3. ग्रांट रोड स्थानक- 56%
4. मुंबई सेंट्रल स्थानक-73%
5. महालक्ष्मी स्थानक-75%
6. आचार्य अत्रे चौक स्थानक-39%
7. वरळी स्थानक-82%
8. दादर स्थानक-88%
9. शितला देवी स्थानक- 71%
10. धारावी स्थानक-81%
11. बिकेसी स्थानक-83%
12. विद्यानागरी स्थानक-87%
13. सांताक्रूझ स्थानक- 93%

संबंधित बातम्या :

मुंबईकरांना वर्षाअखेरीस एमएमआरडिएचं गिफ्ट; दोन मार्गांवरच्या मेट्रो वर्षाअखेरीपर्यंत सुरु होणार

शरद पवार हे महाराष्ट्राचे जाणता राजाच; उदयनराजेंना आव्हाडांचे प्रत्युत्तर