Aaditya Thackeray : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. "आम्ही चूल पेटवण्यासाठी काम करत आहोत. परंतु, काही लोक घर पेटवण्यासाठी काम करत आहेत. अशा लोकांवर काय बोलायचं? असा टोला आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

  


आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित आज बृहमुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाअंतर्गत "अक्षय चैतन्य" सकस आहार योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माध्यमांसोबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 


आदित्य ठाकरे म्हणाले, "गेल्या काही महिन्यांपासून बेस्टमध्ये आपण अनेक बाबतीत बदल घडवून आणत आहोत. मोबीलिटी कार्ड टॅप इन टॅपआऊट सारखे अनेक बदल होत आहेत.  मुंबईतील शाळा आणि बेस्ट डेपोत पौष्टिक आहार मिळावा यासाठी अक्षय चैतन्यची सुरूवात करत आहोत. या योजनेअंतर्गत 13 डेपोंमध्ये कॅन्टीन सुरू करण्यात आले आहे." 


आदित्य ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. "महाविकास आघाडी सरकार शाश्वत विकास कामातून बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, विरोधी पक्ष भांडणं कशी लागतील? देश कसा विखुरला जाईल? समाज कसा विखुरला जाईल? यासाठी प्रयत्न करत आहेत, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 


दरम्यान, बाबरी मशीद पाडली त्यावेळी एकही शिसैनित उपस्थित नव्हता. परंतु, मी उपस्थित होतो या देवेंद्र फडवीस यांच्या दाव्याचाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी समचार घेताल. ते म्हणाले, 1857 च्या लढ्यात त्यांचं खूप योगदान आहे. या वादात पडण्यापेक्षा राम मंदिर चांगलं होत आहे हा आनंद आहे." 


महत्वाच्या बातम्या


आज मध्यरात्री पासून उद्या सकाळी 11 पर्यंत गोविंदवाडी बायपास वाहतुकीसाठी बंद, कल्याणमधील वाहतुकीत बदल 


मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 5 आणि 6 मे ला 'या' भागातील पाणीपुरवठा बंद


Exclusive : प्रश्नपत्रिकेत चक्क प्रश्नासोबत उत्तरं सुद्धा, मुंबई विद्यापीठाच्या लॉ परीक्षेत गोंधळ