मुंबई : प्रश्नपत्रिकेत एखादा प्रश्न डबल आल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी पाहिली आहेत. परंतु, प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांसोबत त्याचे उत्तर देखील आलेले कधी पाहिले नसेल. परंतु, असा प्रकार मुंबई विद्यापीठात (mumbai university) घडला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कायदा आणि विधीच्या पदवी परीक्षेच्या (LLB) दिवाणी प्रक्रिया संहिता (Civil Procedure Code ) या पेपरच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांसोबत चक्क त्याची उत्तरे देखील आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत.  


 मुंबई विद्यापीठातील लॉ परीक्षेचा आज दुपारी दोन वाजता पाचव्या सेमिस्टरचा दिवाणी प्रक्रिया संहिता हा पेपर होता. सर्व विद्यार्थी वेळेनुसार परीक्षा हॉलमध्ये येवून बसले. वेळापत्रकानुसार दुपारी दोन वाजता हॉलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटण्यात आली. प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी  नेहमीप्रमाणे प्रथम प्रश्नपत्रिकेवरून नजर टाकण्यास सुरूवात केली. तर चक्क या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांसोबत त्यांची उत्तरे देखील देण्यात आली होती. 


प्रश्नपत्रिकेतील हा गोंधळ पाहून विद्यार्थ्यांही काही वेळ चक्रावून गेले. प्रश्नपत्रिकेत दिलेली उत्तरे लिहायची की, आपण केलेल्या अभ्यासातील उत्तरे लिहायची हेच कोणाला समजेना. विद्यार्थ्यांनी हा प्रकार हॉलमधील शिक्षकांच्या लक्षात आणून दिला. परंतु, हा प्रकार पाहून शिक्षकही गोंधळून गेले. विद्यार्थ्यांना नक्की काय सल्ला द्यायचा हे त्यांच्याही लक्षात येत नव्हते. शेवटी त्यांनी हा सर्व प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आणून दिला. परंतु, याबाबत विद्यापीठाने पुढे काय निर्णय घेतला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. 


प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, मुंबई विद्यापीठातील परीक्षेत घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी काही काळ गोंधळून गेले होते. परंतु, ही प्रश्नपत्रिका सध्या सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांमधून विद्यापीठाच्या या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.   


महत्वाच्या बातम्या


Happy Birthday Siddhant Chaturvedi : सीएची परीक्षा पास झाला, मात्र ‘गली बॉय’ने करिअरची दिशाच बदलली! जाणून घ्या सिद्धांत चतुर्वेदीबद्दल..


MPSC Interview Schedule 2022: महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर