मुंबई : ठाकरे सरकार मधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाने गाठलंय. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनाची लागण झाली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना करोनाची लागण झाली होती. यातून ते बरे झाले आहेत.


एकनाथ शिंदे यांनाही करोनाची लक्षणं जाणवल्यानंतर करोनाची चाचणी केली त्यानंतर एका दिवसात या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती ठिक असून गेल्या काही दिवसांत त्यांच्या सपंर्कात आलेल्या व्यक्तींनी करोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.


काय आहे ट्वीट?





काल मी माझी कोव्हीड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती.

राज्यात आतापर्यंत कोणकोणत्या प्रमुख नेत्यांना कोरोना झालाय?


राज्यातले नेते 


1. प्राजक्त तनपुरे


2. विश्वजीत कदम


3. बच्चू कडू


4. धनंजय मुंडे


5. संजय राठोड


6. सुनिल केदार


7. एकनाथ शिंदे


8. जितेंद्र आव्हाड


9. वर्षा गायकवाड


10. नितिन राऊत


11. अशोक चव्हाण


12. नाना पटोले


13. संजय बनसोडे


14. अब्दुल सत्तार


15. असलम शेख


16. राजू शेट्टी


17. बाळासाहेब पाटील


18. रवी राणा


19. सदाभाऊ खोत


20. गिरिश व्यास


21. प्रविण दटके


22. सुजितसिंग ठाकूर


23. ऋतुराज पाटील


24. मुक्ता टिळक


25. वैभव नाईक


26. मेघना बोर्डीकर


27. अभिमन्यू पवार


28. कालिदास कोलंबकर


29. किशोरी पेडणेकर


30. सुधीर मुनगंटीवार


31. मुरलीधर मोहोळ


32. हसन मुश्रीफ


केंद्रातले नेते


1. नितिन गडकरी


2. सुरेश अंगडी


3. अमित शहा


4. अर्जुनराम मेघवाल


5. मनिष सिसोदिया


6. सत्येंद्र जैन


7. विनय सहस्रबुद्धे


8. विनायक राऊत


9. नवनीत कौर राणा


10. प्रतापराव पाटील चिखलीकर


11. श्रीपाद नाईक


12. प्रतापराव जाधव


13. संबित पात्रा


14. ज्योतिरादित्य शिंदे


15. प्रल्हाद जोशी


16. शिवराजसिंग चौहान


17. बनवारीलाल पुरोहित


कोरोनामुळे मृत्यू झालेले खासदार –


1. सुरेश अंगडी, कर्नाटकमधून भाजपचे खासदार


2. बल्ली दुर्गाप्रसाद, तिरूपतीचे काँग्रेसचे खासदार


3. गोवर्धन डांगी, बायोरा, मध्यप्रदेशमधून काँग्रेसचे खासदार


4. एच.वसंतकुमार, कन्याकुमारीमधून काँग्रेसचे खासदार


5. अशोक गस्ती, कर्नाटकमधून भाजपचे खासदार


Bhiwandi Building Collapse | दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाख रुपये : एकनाथ शिंदे