मुंबई : भोसरीतील जमीन ही एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं, उद्योगमंत्र्यांनी सांगितलं आहे. मात्र असं असूनही ती जमीन महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या नातेवाईकांच्या नावे कशी? या सर्वप्रकरणात मुख्यमंत्री शांत का? असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

आरोपांच्या चक्रव्युहात अडकलेल्या खडसेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा द्यावा. निर्दोषत्व सिद्ध करुन पदभार स्वीकारावा ही महाराष्ट्राची आणि देशाची परंपरा आहे, असं राऊत म्हणाले.

 

तसंच जो न्याय घरकुल घोटाळाप्रकरणात सुरेश जैन यांना लावला, तोच न्याय खडसेंना का नाही? असाही सवाल संजय राऊत यांनी केला.

 

व्यक्तीगत दोष नाही

विधानसभा निवडणुकीत युती तोडण्यासाठी खडसेच जबाबदार असल्यांच म्हटलं जात होतं. त्याच रागातून शिवसेना उट्टे काढत आहे का, असं संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर राऊत म्हणाले, "खडसेंचा व्यक्तीगत द्वेष नाही. शिवसेना कधीही द्वेषाचं राजकारण करत नाही. शिवसेना लोकभावनेसोबत असते".

 

खडसे दोषी असतील तर कायदेशीर कारवाई करा

 

भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणात एकनाथ खडसे दोषी आढळले, तर जो न्याय सर्वसामान्य नागरिकांना लावला जातो, तोच न्याय खडसेंनाही लावायला हवा. दोषी असल्यास खडसेंवरही कायदेशीर कारवाई करा असंही राऊत म्हणाले. कायदा महत्त्वाचा आहे. मग तो कितीही मोठा नेता असो, त्याच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे, असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

 

मुख्यमंत्री शांत का?

जमीन खरेदीप्रकरणात एकनाथ खडसे एकटेच स्पष्टीकरण देत आहेत. मात्र या प्रकरणात मंत्रिमंडळातील सर्वात ज्येष्ठ नेत्यावर आरोप होत असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शांत आहेत. पण भोसरी जमीन प्रकरण संशयाचा मुद्दा आहे. त्यांनी शांत न राहता, समोर येऊन उत्तर द्यावं. खडसेंवर इतके आरोप होत आहेत, मात्र मुख्यमंत्री का बोलत नाहीत? असा सवाल राऊत यांनी केला.


 

खडसेंवरील आरोप

*कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप, गजानन पाटीलला अटक

*जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप

*दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा हॅकरचा दावा

* भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वाद

संबंधित बातम्या

एकनाथ खडसे राजीनामा द्या : शिवसेना

एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद जाणार?

खडसेंची खुर्ची धोक्यात, अमित शहांनी अहवाल मागवला

मुख्यमंत्री दिल्लीत, खडसेंबाबत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं होण्याची शक्यता

ती जमीन एमआयडीसीचीच, शिवसेनेचा खडसेंवर बाण

..म्हणून विरोधकांनी शकुनी नीती सुरु केली: एकनाथ खडसे

खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणी हॅकर मनिष भंगाळे हायकोर्टात

गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील

‘खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल’

खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण

खडसेंना क्लिन चीट, मग दाऊद कॉलप्रकरणात पुन्हा हॅकरची चौकशी का?

दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

‘आप’कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर