Ravindra Waikar ED Raids: मुंबई : जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी (Jogeshwari Plot Scam) ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या घरी सकाळी 7 वाजल्यापासून ईडीची छापेमारी (ED Raids) सुरू होती. तब्बल 15 तासानंतर रवींद्र वायकरांची ईडी चौकशी संपली. वायकर यांच्या जोगेश्वरीतील श्याम नगर तलावाजवळील सेवालय कार्यालय आणि मातोश्री क्लबमधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्व पेपरची तपासणी केल्याची माहिती मिळत आहे. वायकरांशी संबंधित 4 ठिकाणी ईडीची छापेमारी झाल्याचं समोर येत आहे, तर 17 जानेवारीला पुढील चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना रवींद्र वायकरांना देण्यात आल्या आहेत. 


जुलै 2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भ्रष्ट पद्धतीनं जोगेश्वरीतील खेळाचं मैदान ताब्यात घेऊन त्यावर तब्बल 500 कोटी रुपयांचं पंचतारांकित हॉटेल बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांवर केला होता. तसेच, यासंदर्भातील तक्रारही सोमय्यांनी केली होती. याचप्रकरणी ईडीकडून रवींद्र वायकरांची चौकशी सुरू आहे.  


भाजप नेते किरीट सोमय्यांचे आरोप नेमके काय?


रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. सप्टेंबरच्या महिन्यात रविंद्र वायकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.


प्रकरण नेमकं काय? 


रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांच्या अडचणीत वाढ झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


वायकरांवर आयकरची धाड, साळवींच्या कुटुंबाची ACB चौकशी; निकालापूर्वी ठाकरेंच्या आमदारांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा