Mumbai : लोकांनी उत्सवासाठी गणेशाच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे. सण साजरा करत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी इको-फ्रेंडली मूर्ती बनवणे हा सर्वोत्तम पर्याय सध्या मानला जात आहे. आता गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच मुंबईतील गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक मूर्ती तयार करून यंदा पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना करण्यात आले आहे.


महापालिकेच्या या आवाहनाला अंधेरी पश्चिमेकडील स्वप्नाक्षय गणेशोत्सव मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. आमंत्रण पत्रिका लग्न आणि इतर काही कागदं आपण काम झाल्यानंतर कचऱ्याच्या पेटीत टाकून देतो. अनेकदा यावर देवदेवतांचे फोटो तसेच धर्मांची चिन्ह असतात. त्यामुळे देव-देवतांचा अपमान होतो. अंधेरीतील स्वप्नाक्षय गणेश मंडळाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 


स्वप्नाक्षय गणेशोत्सव मंडळाने एकता मंचच्या सहकार्याने मागील सहा महिन्याच्या काळात तब्बल पन्नास हजाराहून अधिक सर्व धर्मीयांच्या लग्न पत्रिका किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांची पत्रके गोळा केली आहेत. या सर्व धर्मीय लग्न पत्रिका वर देवी-देवतांचा फोटोचा अपमान व विटंबना होऊ नये म्हणून सर्व धर्मीयांच्या लग्नपत्रिकांपासून यावर्षी नऊ फुटाचा गणपती बनवण्याचा निश्चय स्वप्नाक्षय गणेशोत्सव मंडळांने केला आहे.


या साठी स्वप्नाक्षय गणेशोत्सव मंडळांने मुंबई मध्ये मागील सहा महिन्यापासून सर्व गणपती मंडळांना आवाहन केला होता ज्यांच्याकडे वेगवेगळ्या धर्मांचं लग्नपत्रिका व इतर इनविटेशन किंवा इतर पेपर कार्ड ज्यावर देवी देवतांचे फोटो असेल या सर्व कागद एकत्र करावे आणि ते स्वप्नाक्षय गणेशोत्सव मंडळाकडे आणून देण्याचे आवाहन केले गेले होते.


स्वप्नाक्षय गणेशोत्सव मंडळांच्या या उपक्रमाला मुंबईतील वेगवेगळ्या गणपती मंडळांनी चांगला प्रतिसाद देत पन्नास हजाराहून अधिक सर्व धर्मीयांच्या लग्न पत्रिका किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांची पत्रके गोळा केली आहेत. या सर्व धर्मीयांच्या लग्न पत्रिका मधून यंदा मुंबईला पहिला सर्व धर्मीय गणपती बाप्पाचा आगमन होणार आहे. यासाठी या सर्व धर्मियांच्या लग्नपत्रिका महापालिकेचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या हस्ते स्वप्नाक्षय गणेशोत्सव मंडळाकडून मूर्तिकार नरेश मिस्त्री यांना सुपूर्द करण्यात आल्या.यावेळी माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेडकर आणि एकता मंचचे प्रशांत काशीद आणि मंडळाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.