Datta Dalvi : माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल अपशब्द वापरणं भोवलं आहे. दत्ता दळवी यांना 14  दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून (Thackeray Group) लगेचच त्यांच्या जामीनासाठी अर्ज दाखल केला, मात्र पोलिसांनी आपलं म्हणणं न मांडल्यामुळे जामीन मिळू शकला नाही. त्यामुळे आज तरी पोलीस कोर्टात म्हणणं मांडतात का? आणि त्यानंतर दत्ता दळवी यांना जामीन मिळतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जामीन न मिळाल्यास महामार्ग रोखून धरू अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे. तसेच, जामीन न मिळाल्यास ईशान्य मुंबईत (Mumbai News) शिवसैनिक आक्रमक होतील, असा इशाराही ठाकरे गटानं दिला आहे. 


दत्ता दळवी यांचे पुत्र योगेश दळवी यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांची सकाळी भेट घेतली. त्यामुळे आज तरी दत्ता दळवींना जामीन मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


दत्ता दळवी यांच्या अटकेवरुन 'सामना'तून शिंदे गटावर हल्लाबोल


ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांच्या अटकेवरुन सामनातून टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. नालायक सरकारला खड्ड्यात गाडून त्यावर भगवा झेंडा फडकवूनच ती पुढे जाईल, असं सामनात म्हटलं. दरम्यान भांडूपमध्ये  शिवसेना ठाकरे गटाचा कोकणवासीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होता या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलीय.


दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड 


जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. अज्ञातांनी दत्ता दळवींच्या घराच्या परिसरात शिरुन गाडीची तोडफोड केली आहे. आज सकाळी पोलिसांनी दत्ता दळवींना अटक केली आहे. कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर तातडीनं दळवींच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र आज जामिनावर निर्णय झाला नाही. त्यामुळे दळवींना ठाणे कारागृहाकडे नेण्यात आलं आहे. आज दळवींचे वकील पुन्हा जामिनासाठी अर्ज करणार आहेत. 


कोण आहेत दत्ता दळवी? (Who Is Datta Dalvi) 


बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक अशी दत्ता दळवींची ओळख. दत्ता दळवींनी आपली कारकीर्द सामान्य शिवसैनिक म्हणून केली. आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते अल्पावधीतच पुढे आले आणि बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू बनले. शिवसेनेच्या विभाग क्रमांक 7 च्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. तसेच 2005 ते 2007 या दरम्यान दत्ता दळवींनी मुंबईचे महापौर म्हणून काम केलं. या काळात त्यांनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. ईशान्य मुंबईमध्ये दत्ता दळवींचा मोठा प्रभाव आहे. 


सन 2018 साली दत्ता दळवींनी आपल्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते चांगलेच चर्चेत आले होते. नंतरच्या काळात एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेनेवर दावा सांगितला. त्या काळात दत्ता दळवींनी उद्धव ठाकरेंसोबत राहून त्यांची निष्ठा कायम ठेवली. आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच शिवी दिल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Datta Dalvi : बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, उद्धव ठाकरेंचा शिलेदार, थेट मुख्यमंत्र्यांना म्हणाले भोXXX, कोण आहेत दत्ता दळवी?