मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅकने तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने 6 आणि 7 ऑक्टोबरला होणारे परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. या परीक्षेच्या तारखा लवकरच ठरवून त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व आयडॉलच्या लिंकवर प्रदर्शित केल्या जाणार आहेत.
ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक आढळला आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ तक्रार नोंदविणार आहे. यामुळे या परीक्षांमध्ये ही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. 3 ऑक्टोबरपासून दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या परीक्षेस सुरुवात झाली. आज या परीक्षेचा दुसरा पेपर होता. तांत्रिक अडचणीमुळे आजचे हे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. तसेच उद्या (7 ऑक्टोबर) होणाऱ्या परीक्षा तृतीय वर्ष बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, तृतीय वर्ष बीएस्सी आयटी सत्र 6 व बॅकलॉगच्या परीक्षा प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकॉम, एमसीए सत्र 1 व सत्र 2 या परीक्षाचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. 6 आणि 7 ऑक्टोबरला या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
सुरवातीला तांत्रिक अडचणी दूर करण्याचा आम्ही काम करत असल्याचं सांगत विद्यापीठाने परीक्षा उशिरा सुरू करण्याचे ठरविले पण ही तांत्रिक अडचण लवकर सोडविणे कठीण असल्याचे समजताच विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून लवकरच या आजच्या परीक्षेबाबतचा वेळापत्रक जाहीर केल जाणार असल्याच विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
- मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ, तांत्रिक अडचणींमुळे पेपर पुढे ढकलला
- सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांच्या वेबसाईटचे सर्व्हर क्रॅश, 6 ते 8 ऑक्टोबर रोजीच्या परीक्षा पुढे ढकलल्या