मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी महिला डॉक्टरांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही महिला डॉक्टर आरोपी फरार असून या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.
नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनं रॅगिंगला कंटाळून मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी महाविद्यालयात सीनिअर असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात अॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
मात्र, या आरोपी सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी या तरुणीने बुधवारी आत्महत्या केली आहे. मयत तरूणी ही आदिवासी तडवी समाजाची होती.
तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीकरिता आदिवासी तडवी समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने जळगावात आंदोलन केले गेले. तसेच या प्रकरणी सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला जात असून आरोपांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
डॉ.पायल नायर रुग्णालय मंबईमध्ये शिक्षण घेत होती. 1 मे 2018 रोजी तीला मागासर्गीय राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. यानंतर रुग्णालयात सीनिअर असलेल्या डॉ. हेमा आहूजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी सतत तिचा छळ केला. तिने मागासवर्गीय आरक्षित जागेवर प्रवेश मिळवला म्हणून तिला जातीवाचक टोचून बोलत होते. याबाबत तरुणीने वारंवार डीनकडे तक्रार देखील केली होती. पण तरीसुद्धा त्याची योग्य दखल घेण्यात आली नाही. पायलच्या आईने देखील या घटनेआधी नायर रुग्णालयाच्या डीनला पत्र लिहून याबाबत कळविले होते.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी महिला डॉक्टरांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, आरोपी फरार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 May 2019 10:51 AM (IST)
नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनं रॅगिंगला कंटाळून मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -