Mumbai News : बेस्ट (BEST) उपक्रमामार्फत 'मुंबई दर्शन' (Mumbai Darsha) या सेवेकरिता दुमजली 'ओपन डेक' बसगाड्या (Open Double Deck Buses) प्रवर्तित करण्यात येत आहेत. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये सद्या असलेल्या तीन 'ओपन डेक' बसगाड्यांचे आयुर्मान पंधरा वर्षे पुर्ण झाले आहे. त्यामुळं शासन निर्णयाप्रमाणे या गाड्या पाच ऑक्टोबरला मोडित काढण्यात येणार आहेत. मुंबईच्या जनतेचे आणि पर्यटकांचे ओपन डेक बसगाड्यांवर विशेष प्रेम आहे. पर्यटकांना या बसगाड्यांमधून पर्यटनाचा वेगळा अनुभव मिळत आहे. तसेच 'मुंबई दर्शन' बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं बेस्ट उपक्रमामार्फत नवीन दुमजली ओपन डेक बसगाड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.


सोमवार ते शुक्रवार या दिवशी तीन तर शनिवार आणि रविवार पाच बसगाड्या


दुमजली ओपन डेक बसगाड्यांची खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 'मुंबई दर्शन' बससेवा खंडीत हाऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे वातानुकूलित दुमजली इलेक्ट्रिक बसगाडया मुंबई दर्शनासाठी तयार करण्यात येत आहेत. सोमवार ते शुक्रवार या दिवशी तीन वातानुकूलित दुमजली बसगाड्या आणि शनिवार आणि रविवार या दिवशी पाच वातानुकूलित दुमजली बसगाड्या पर्यटकांकरिता प्रवर्तित करण्यात येणार आहेत. 


या ठिकाणांची पर्यटकांना होते सफर


बेस्ट उपक्रमातर्फे गेल्या अनेक वर्षापासून पर्यटकांसाठी मुंबई दर्शन सेवा पुरवली जाते. या 'मुंबई दर्शन' सेवेमार्फत मुंबई दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना मंत्रालय विधानभवन सी. एस एमटी. बीएमसी हुतात्मा चौक, हॉर्निमन सर्कल, आरबीआय, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, एशियाटीक लायब्ररी जुने कस्टम हाऊस, एनसीपीए मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक ओव्हल मैदान, मुंबई हायकोर्ट, मुंबई विद्यापीठ आदी ठिकाणी फिरवले जाते. 


महत्त्वाच्या बातम्या:


Mumbai BEST Bus News :  मोठी बातमी! बेस्टच्या ताफ्यातील 400 बसचा वापर तात्पुरता बंद, प्रशासनाने दिले आगीचे कारण